Thackeray - Shinde Wedding : पुण्यातल्या जुन्नरमध्ये ठाकरे आणि शिंदे यांच्या विवाहसोहळ्याची चर्चा
बातमी पुण्यातल्या जुन्नरमधल्या सध्या चर्चेत असलेल्या एका लग्नसोहळ्याची. उद्या होणाऱ्या या विवाहसोहळ्यात ठाकरे आणि शिंदे कुटुंबीयांची सोयरीक होतेय आणि ही दोन्ही कुटुंबं शिवसेनेशी संबंधित आहेत. राज्यात शिवसेनेतील ठाकरे आणि शिंदे गटात संघर्ष सुरु असताना रमेश शिंदे आणि अनुराधा ठाकरे यांचा हा विवाहसोहळा सध्या चर्चेचा विषय ठरलाय.