Jejuri Mardani Dasara Utsav : जेजुरी गडावर मर्दानी दसरा उत्सव सुरू, भाविकांची तुफान गर्दी
जेजुरी गडावर मर्दानी दसरा उत्सव सुरू आहे. 40 किलोची देवाची जी तलवार आहे. त्या तलवारीलाच खंडा असे म्हटले जाते. या खंडाच्या विविध कसरती केल्या जातात. याला मर्दानी दसरा असे म्हटले जाते. राज्यभरातून हजारो भाविकांनी हा उत्सव पाहण्यासाठी गर्दी केली आहे.. रात्री देवाची पालखी गडावरून गावामध्ये येते. ही पालखी गडावर सकाळी परत आल्यानंतर मर्दानी दसरा उत्सवाला सुरुवात होते..