Jejuri Donkey Market :जेजुरीत पौष पोर्णिमेनिमित्त गाढवांचा बाजार,विविध प्रकारची गाढवं दाखल:ABP Majha
महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीत पौष पोर्णिमेनिमित्त गाढवांचा बाजार भरलाय. जेजुरीच्या गाढवांच्या पारंपारिक बाजारात काटेवाडी, गावठी आणि विविध प्रकारचे हजारो गाढवे दाखल झालीत... पौष पौर्णिमेला जेजुरीच्या खंडेरायाची या त्रा असते आणि याच दिवशी गाढवांचा बाजाराचा मुख्य दिवस असतो. जेजुरीत संपूर्ण महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान आणि मध्यप्रदेशमधून गाढवे विक्रीस येत असतात. दहा हजार रुपयांपासून ते एक लाख वीस हजारांपर्यंत भाव या गाढवांना मिळालाय..