Dive Ghat Accident | दिवे घाटातील अपघातात संत नामदेव महाराजांच्या वंशजाचा मृत्यू | ABP Majha

Continues below advertisement
नामदेव महाराज कार्तिकी वारी पालखी सोहळ्याच्या दिंडीत अपघात झाला. दिवेघाटात ब्रेक फेल झालेला जेसीबी थेट दिंडीमध्ये घुसला. यात संत नामदेव महाराजांचे सतरावे वंशज सोपान महाराज नामदास (वय 36 वर्षे) यांच्यासह अतुल महाराज आळशी (वय 24 वर्षे) या वारकऱ्याचा मृत्यू झाला तर 15 वारकरी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी हडपसर इथल्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लोणी काळभोर पोलिस घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास सुरु आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram