Jay Pawar Engagement Sharad Pawar : जय पवार आणि ऋतुजा पाटलांनी घेतले शरद पवारांचे आशीर्वाद

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार आणि उद्योजक प्रवीण पाटील यांची कन्या ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा आज पुण्यात संपन्न झालाय.

साखरपुड्याला अजित पवार यांचे सर्व कुटुंबीय ज्यामध्ये शरद पवार, प्रतिभा पवार, प्रतापराव पवार सुप्रिया सुळे आणि पवार कुटुंबीयातील सर्व सदस्य उपस्थित होते.

पुण्यातील घोटावडे या ठिकाणी असलेल्या अजित पवार यांच्या फार्म हाऊसवर मोजक्या लोकांमध्ये साखरपुडा सोहळा संपन्न झालाय. सोहळ्याला फक्त विशेष आमंत्रितांनाच बोलवण्यात आलं होतं. आकर्षक विद्युत रोषणाई आणि भव्य आरास आणि पारंपारिक पद्धतीने हा सोहळा संपन्न झाला.

ऋतुजा पाटील यांचे अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांच्याशी लग्न होणार आहे.

ऋतुजा या फलटण येथील सहकार महर्षी हणमंतराव पवार यांची नात आहेत.

हणमंतराव पवार यांची कन्या सौ. पल्लवी प्रवीण पाटील यांची कन्या आहे ऋतुजा पाटील

ऋतुजा पाटील यांचे वडील प्रवीण पाटील हे पुणे व्यावसायिक आहेत.

ऋतुजा पाटील यांचे वडील आयडीया या टेलीकॉम कंपनीत सीईओ म्हणून काम करत होते.

पाटील यांनी स्वतःचा 'जायंट सायकल' म्हणून सायकल मॅन्युफॅक्चरिंग ब्रँड सुरू केला आहे. सध्या ते मल्टीनॅशनल कंपन्याना कन्सल्टन्सी करण्याचे काम करतात.

ऋतुजा ही फलटण येथील श्रीराम बाजार या किराणाशी संबंधित मॉलची संचालक आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola