Jaggery tea | गुळाचा चहा | म्हणून साखरेपेक्षा गूळ भाव खातोय!
गुळाचा चहा.. सध्या ठिकठिकाणी हा नवा व्यवसाय सुरु झाल्याचं आपण पाहतोय. गुळाच्या चहाची विक्री करताना, चहा प्रेमींना दुकानमालक गुळाचे फायदे ही पटवून देतायेत. परिणामी अनेक घरात साखरेची जागा गुळाने घेतल्याचं पहायला मिळतंय. म्हणूनच की काय अलीकडे साखरेपेक्षा गुळाचा भाव अधिक वाढू लागलाय.