Pimrpi IPS Krishna Prakash 'मटणवाले चाचा' IPS कृष्णप्रकाश! वेशांतर करुन पोलिसांची घेतली 'परीक्षा'

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश हे त्यांच्या खास आणि डॅशिंग शैलीसाठी ओळखले जातात. याची प्रचिती त्यांनी पुन्हा एकदा आणून दिली. सामान्य नागरिकांना पोलीस योग्य पद्धतीने सेवा देतायेत का? सामान्य नागरिकांचं यातून समाधान होतंय का? हे अनुभवण्यासाठी स्वतः कृष्ण प्रकाश यांनी वेशांतर केलं. चक्क 'मटणवाले चाचा' बनून त्यांनी पोलिसांची परीक्षा घेतली. यात काही पोलीस पास तर काही नापास देखील झाले. नापास झालेल्यांची आता मात्र खैर नाही. यासाठी मध्यरात्री चार तास त्यांनी पाहणी केली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola