Pune Indrayani River pollution : इंद्रायणी नदीच्या पाण्यातून रसायनांचा फेस : ABP Majha
Continues below advertisement
Pune Indrayani River pollution : पुण्यातील देवाच्या (Alandi) आळंदीतील वारकरी सांप्रदायासाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या या इंद्रायणी नदीची (Indrayani River) दयनीय अवस्था झाली आहे. इंद्रायणी नदीतून पाणी नव्हे तर साबणाचा फेसासारखे पाणी वाहताना दिसत आहे. पिंपरी चिंचवडमधील कंपन्या रसायनयुक्त पाणी नदीत सोडतात, त्यामुळं नदी प्रदुषित झाली आहे. या प्रदुषणामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
आळंदी शहरातून (Alandi News) वाहणाऱ्या इंद्रायणी नदीचा उगम लोणवळ्यात (Lonavala) होते. लोणावळ ते आळंदी या मार्गावर पिंपरी-चिंचवडचं (Pimpri-Chinchwad) मोठं औद्योगिक क्षेत्र वसलेलं आहे. यात कंपन्यामुळे या नदीचं फेसाळलेलं रुप तयार झालं आहे. या कंपन्यामधून रसायन युक्त पाणी सोडलं जातं आणि त्याच्यामुळे नदीची अवस्था खराब झाली आहे.
Continues below advertisement