Indrayani River Pune : पुण्याच्या आळंदीतील इंद्रायणी नदी आजही फेसाळलेलीच : ABP Majha
आता बातमी, आळंदीतील इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाची, पुण्याच्या आळंदीतील इंद्रायणी नदी आजही फेसाळलेलीच आहे. सलग तिसऱ्या दिवशी इंद्रायणीतील पाण्यावर विषारी फेस दिसून येतोय, या नदीच्या प्रदुषणाचा मुद्दा हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी ठरला होता. या नदीच्या प्रदुषणावरुन राज्य सरकारला धारेवर धरण्यात आलं होतं. मात्र तरीही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून अद्यापही नदीच्या प्रदूषणाबाबत कारवाई होताना दिसत नाही,