Indapur Pune : वडिलांची आठवण असलेलं घर जमीनदोस्त न करता बाजूला सारण्याचा प्रयोग
Indapur Pune : वडिलांची आठवण असलेलं घर जमीनदोस्त न करता बाजूला सारण्याचा प्रयोग
हेही वाचा :
नाताळ आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सगळेजण सज्ज झाले आहेत. झगमगाट, रोषनाई करत उत्साह वाढलाय. सेलिब्रेशच्या तयारीला वेग आला आहे. सध्या भारतासह जगभरात ख्रिसमस आणि नववर्षानिमित्त उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी सजावटही करण्यात आली आहे. यंदाही दरवर्षीप्रमाणे 25 डिसेंबर रोजी ख्रिसमसचा सण जगभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे. दरम्यान, राज्यातील खाद्यगृह, हॉटेल, रेस्टॉरंट, परमीट रूम आणि ऑर्केस्ट्रा बार पहाटे 5 वाजेपर्यंत खुले ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. ही परवानगी विशेषतः 24, 25 आणि 31 डिसेंबरच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत लागू असेल. इंडियन हॉटेल व रेस्टॉरंट असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी यांनी 10 डिसेंबर 2024 रोजी शासनाला या संदर्भात विनंती केली होती. या मागणीचा विचार करून शासनाने नाताळ आणि नववर्षाच्या विशेष प्रसंगी लोकांना आनंद साजरा करता यावा यासाठी ही सवलत मंजूर केली आहे. सर्व खाद्यगृह आणि हॉटेल चालकांना यासंदर्भात नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून स्थानिक प्रशासनाकडून अतिरिक्त पोलिस बंदोबस्ताचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. ही सवलत मिळाल्याने हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. वाढीव वेळेमुळे ग्राहकांना त्यांच्या कुटुंबीयांसह किंवा मित्रमंडळीसोबत नाताळ व नववर्षाच्या संध्याकाळी अधिक वेळ घालवता येणार आहे. दरम्यान, प्रशासनाने ग्राहकांना सार्वजनिक ठिकाणी शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले आहे. तसेच मद्यपान करून वाहन चालवण्यापासून दूर राहण्याचे आणि इतरांच्या सुरक्षिततेचा विचार करण्याचेही निर्देश दिले आहेत. खाद्यगृह व हॉटेल्ससाठी वाढीव वेळ दिल्याने ग्राहकांची गर्दी होण्याची शक्यता असून, स्थानिक प्रशासनाकडून त्यासाठी योग्य नियोजन केले जाणार आहे. या निर्णयामुळे उत्सवाच्या वातावरणाला अधिक रंगत येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.