Indapur NCP : इंदापुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांत राडा

Continues below advertisement

Indapur NCP : इंदापुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांत राडा इंदापुरात विविध विकासकामांच्या भूमिपूजनाच्या कोनशिलेवर खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव नसल्याने शरद पवार गट व अजित पवार गट आमने सामने येत त्यामध्ये राडा झालाय ..
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाची इमारतीच्या कोनशिलेवर खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव नसल्याने शरद पवार गट आक्रमक झाला होता. त्यांनी थेट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात घुसून बोंबाबोंब अधिकाऱ्याला घेराव व ठिय्या आंदोलन केले. तर याच दरम्यान अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी मोठ्या जमावाने भूमिपूजनाच्या ठिकाणी आल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारात दोन्हीही गट आमने-सामने येऊन कार्यकर्त्यांची  गंचाडागचांडी झाली यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे बराच गोंधळ उडाला होता. घाई गडबडीत कोनशिलेवर राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव राहिले आहे ते दुरुस्त करण्यात येईल असे आमदार दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram