Zika virus Pune : झिका व्हायरसच्या रूग्णसंख्येत वाढ; दोन ज्येष्ठ नागरिकांचा जीव गेला : ABP Majha

Continues below advertisement

Pune Zika Virus: पुणे शहर परिसरात झिका व्हायरसच्या (Pune Zika Virus) रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. झिका रुग्णांची संख्या आता जवळपास 50 पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे पुणेकरांची डोकेदुखी आणखी वाढली आहे. पुण्यातील झिका रुग्णांची संख्या 47 वर पोहचली आहे. अशामध्ये पुणेकरांनी काळजी घ्यावी असं आवाहन पुणे महानगर पालिकेकडून केले जात आहे. पुणे महानगर पालिकेकडून झिकाला उपाययोजना देखील केल्या जात आहेत.

पुणे शहरातील झिकाची (Pune Zika Virus) रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. पुण्यात अजून एक नवीन रुग्ण आढळल्याची माहिती आहे. यामुळे एकूण रुग्णसंख्या 47 वर पोहोचली आहे. झिकाचा संसर्ग झालेल्या दोन ज्येष्ठांचा काही दिवसांपुर्वी मृत्यू झाल्याप्रकरणी सार्वजनिक आरोग्य विभागाची समिती त्यांचे मृत्यू परीक्षण करणार आहे. त्यातून त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. पुण्यात झिकाचे (Pune Zika Virus) सर्वाधिक ११ रुग्ण एरंडवणे क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात आढळले आहेत. झिकाबाधित (Zika Virus) असलेल्या दोन ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला होता. 

झिकाबाधित (Zika Virus) असलेल्या दोन ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला त्यांना झिकाबरोबरच इतरही सहव्याधी असल्याची माहिती आहे. या नागरिकांना हृदयाचा आणि यकृताचा आजार असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे त्यांचा मृत्यू झिकामुळे झाला की, इतर कशामुळे झाला याबाबतची तपासणी आरोग्य विभागाकडून केली जात आहे. 

झिकापासून बचाव कसा कराल?

झिकापासून बचाव करण्यासाठी आरोग्य विभागाने नियमावली जाहीर केली आहे. घरामध्ये डास होणार नाही, याची काळजी घ्या. घरात स्वच्छता ठेवा. मच्छरदाणीचा जास्तीत जास्त वापर करा. घरात साठवलेले पाणी जास्त काळ ठेवू नका. घराच्या खिडक्या आणि दरवाज्यांना जाळी लावा. आपल्या परिसरातदेखील स्वच्छता बाळगण्याचं आवाहन झिका (Zika Virus) आणि डेंग्युच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलं आहे. झिका व्हायरसचा (Zika Virus) धोका गर्भवती माता आणि तिच्या गर्भाला जास्त असल्यामुळे त्यांच्या तपासणीसाठी आरोग्य विभागाने भर दिला आहे. झिकाच्या एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक प्रमाण हे गर्भवती मातांचे आहे. 

झिका विषाणूपासून (Zika Virus) बचाव करण्यासाठी घराभोवती पाणी साचू देऊ नका. पाणी साचलेल्या ठिकाणी डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होते. घरामध्ये डास शिरणार नाही याची काळजी घ्या. डास चावणार नाही याची काळजी घ्या. घरात डास आले तर त्यासाठी कडुलिंबाचा पाला जाळा. संध्याकाळी दारे खिडक्या उघड्या ठेऊ नका. कापूराचा वापर करून तुम्ही १५ ते २० मिनिटात डासांना दूर पळवू शकता. कडुलिंब आणि नारळाचं तेल एकत्र करून आपल्या शरीरावर चोळा. दोन दिवस ताप राहिल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram