Hemant Rasne Kasaba Pune : हेमंत रासनेंचा मिसळीवर ताव; विजयावर विश्वास

Continues below advertisement

Hemant Rasne Kasaba Pune : हेमंत रासनेंचा मिसळीवर ताव; विजयावर विश्वास 

हेही वाचा : कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्र विधानसभेच्या मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ पुणे लोकसभा मतदारसंघाचा एक विभाग आहे. हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला मानला जात होता, कारण ते 1995 ते 2019 पर्यंत भाजपचे आमदार जिंकत आले आहेत.मात्र, 2023 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत जनतेने काँग्रेसनेते रवींद्र धंगेकर यांना निवडून दिलं होतं. कसबा पेठ ही पाचव्या शतकात स्थापन झालेली पहिली पेठ होती आणि पुण्यातील सर्वात जुनी पेठ आहे. याला पुणे शहराचे हृदय असंही म्हटलं जातं. 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मुक्ता शैलेश टिळक यांनी कसबा पेठ मतदारसंघातून 75,492 मतांनी विजय मिळवला होता. मात्र, त्यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक पार पडली त्यामध्ये काँग्रेसने विजय मिळवला, त्यानंतर आता होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पुन्हा मोठी तयारी केली आहे.   पोटनिवडणुकीनंतरची मतदारसंघातील परिस्थिती कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर हे विद्यमान आमदार आहेत.रविंद्र धंगेकरांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये देखील त्यांचं नशीब आजमावलं होतं, पण ते लोकसभा हरले. लोकसभेत भाजपचे मुरलीधर मोहोळ यांचा विजय झाला. त्यानंतर पुन्हा एकदा धंगेकरांनी विधानसभेची तयारी सुरू केली. या विधानसभा निवडणुकीमध्ये कसबा मतदारसंघातील जनता कोणाच्या पारड्यात आपली मते टाकते, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram