Pune Heavy Rain | पुणे शहरात 2 तासांपासून मुसळधार पाऊस, पुणे- सोलापूर महामार्ग पावसामुळे बंद
पुण्यात पावसाने जोरदार हजेरी लावत अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. अनेक रस्ते, नाले पाण्याखाली गेले आहेत. संध्याकाळपासून पावसाने झोडपून काढले आहे. पुण्यातील पावसाचा जोर काही वेळात कमी होईल असा अंदाज वेधशाळेने दिला आहे. तोपर्यंत पुणेकरांना आजची संपूर्ण रात्र जागून काढावी लागण्याची शक्यता दिसत आहे.