Hasan Mushrif ED Raid Pune : पुण्यातील व्यावसायिकांच्या घरी ईडीची छापेमारी
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांचे व्यावसायिक भागीदार असलेल्या ब्रिक्स इंडिया कंपनीचे संचालक चंद्रकांत गायकवाड यांच्या पुण्यातील घरी ईडीकडून आज पुन्हा एकदा छापेमारी करण्यात आली. चंद्रकांत गायकवाड राहत असलेल्या पुण्यातील कोरेगाव पार्क भागातील लापीस लॅझुली सोसायटीत ईडीच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जातेय. दरम्यान लॅपिझ लॅझुली सोसायटीबाहेरुन ईडीच्या छापेमारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी