Pune Crime : मैत्रिणीला गिफ्ट देण्यासाठी चोरी करणाऱ्या 2 चोरट्यांना हडपसर पोलिसांनी केली अटक

पुण्यातील एका सराफा दुकानातून दागिन्यांची चोरी करणाऱ्या 2 चोरट्यांना हडपसर पोलिसांनी अटक केली. मैत्रिणीला गिफ्ट देण्यासाठी आणि व्यसनासाठी हे दोघं चोरी करायचे. आश्चर्याची बाब म्हणजे दोघंही पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात वैद्यकीय शाखेचं शिक्षण घेतात. त्यातील एक जण बी ए एम एस तर दुसरा बीएससी नर्सिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे. चोरी झालेल्या सराफा दुकानाच्या मालकाने पोलिसांत तक्रार केली होती. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत पोलिसांनी दोघांनाही अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडील अडीच लाख रुपये किंमतीचा सोन्याच्या 4 अंगठ्या जप्त केल्या.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola