Pune Sinhgad : गुढीपाडव्याच्या दिवशी सिंहगड किल्ल्यावरील वाहतूक 'या' वेळेत बंद राहणार
abp majha web team
Updated at:
01 Apr 2022 11:35 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPune News : पर्यटकांनी कायम गजबजलेल्या किल्ले सिंहगडावर (Sinhgad) गुढीपाडव्याच्या (Gudhipadwa) दिवशी (2 एप्रिल) पहाटे पाच ते दुपारी बारा वाजेपर्यंत किल्ल्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद असणार आहे.
पुणे आणि परिसरातील अनेकांचा शनिवार-रविवारच्या वीकएण्डचा कार्यक्रम काय, असे विचारल्यास, सिंहगडावर जायचे आहे, हे उत्तर हमखास मिळेल. पण उद्या सिंहगडावर एका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे पहाटे पाच ते दुपारी 12 पर्यंत किल्ल्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद असणार आहे. , असे आदेश पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहे.