Girish Bapat | लोकसभेवेळी पार्थची किंमत कळली नव्हती का? : गिरीश बापट

Continues below advertisement
 युवा नेते पार्थ पवार यांच्याबद्दल शरद पवार यांनी केलेले वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. पार्थ यांना लोकसभेला उमेदवारी देताना त्यांची किंमत किती, मॅच्युरिटी किती याची माहिती होती, त्यावेळी त्यांना अशीच उमेदवारी दिली का? असा टोला भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी पुण्यामध्ये लगावला. राजकीय जीवनात अनेकांना आपली मतं व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे. पार्थ पवार तर पवार कुटुंबातील आहेत. त्यांना वाटलं असेल आपण काही सत्य बाहेर काढावे, म्हणून ते बोलले असतील असेही गिरीश बापट यांनी म्हटलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram