Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत

Continues below advertisement

Gatari Pune News: श्रावण महिना सुरू होत असल्याने अनेकांना गटारी अमावस्येची आतुरता होती. महाराष्ट्रात आषाढ अमावस्येला ‘गटारी अमावस्या’ असे म्हटले जाते. या अमावस्येनंतर पवित्र श्रावण महिना सुरू होतो. त्यामुळे मासे, चिकन, मटण खाणाऱ्यांसाठी आजचा दिवस पर्वणी आहे. त्यामुळे मासे, चिकन, मटण खरेदीसाठी खवय्यांची मोठी गर्दी झाली आहे. गटारी अमावस्येनिमित्त आज पुण्यात मटण खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पुणे शहरातील सुभाष नगर परिसरातील मटण दुकानांबाहेर सकाळपासूनच ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.गटारी अमावस्येच्या पार्श्वभूमीवर मटणाला मोठी मागणी असल्याने नागरिक सकाळी लवकरच खरेदीसाठी दुकानांवर पोहोचले. त्यामुळे काही ठिकाणी दुकानांच्या परिसरात मोठी गर्दी झाली होती. सणाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांची वाढती संख्या लक्षात घेता मटण विक्रेत्यांकडूनही मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली आहे.राजेंद्रनगर परिसरातील मटण दुकानांबाहेर लागलेल्या रांगांमुळे गटारी अमावस्येचा उत्साह नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola