Ganeshotsav 2025 Flower Market | Pune च्या Mandai मध्ये खरेदीसाठी पुणेकरांची गर्दी
पुण्यात गणेशोत्सवाच्या तयारीसाठी लगबग सुरू आहे. पुणेकर पूजेच्या साहित्यासह सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्यांची खरेदी करत आहेत. पुण्यातल्या मंडईमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी दिसत आहे. मार्केट यार्डच्या फुलबाजारातही सकाळपासून पुणेकरांनी मोठी गर्दी केली आहे. या फुलबाजारातून अख्ख्या पुणेभरात फुलांची विक्री केली जाते. झेंडू, शेवंती, गुलाब यांसारख्या भारतीय फुलांसोबतच विदेशी फुलांचीही विक्री या ठिकाणी होत आहे. फुलांच्या विक्रेत्यांना यंदाचा गणेशोत्सव चांगला जाईल अशी अपेक्षा आहे. एका विक्रेत्याने सांगितले की, "यंदाचा गणेशोत्सव आहे हा सोन्यासारखा असणार आहे." गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठांमध्ये उत्साह संचारला आहे. नागरिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी बाहेर पडले आहेत.