WEB EXCLUSIVE | मोफत मिळाल्यावर तरी पुणेकर हेल्मेट वापरतील का?
हेल्मेट सक्ती करुनही, हेल्मेट न घालणार्यांकडून दंड वसूल करुनही पुणेकरांमधे हेल्मेट वापरण्याच प्रमाण म्हणावं तेवढं वाढलेलं नाही. त्यामुळे पुण्यातील काही स्वयंसेवी संस्था आणि ड्रायव्हींग स्कुल्स कडून पुण्यातील प्रमुख चौकांमधे कालपासून मोफत हेल्मेट वाटप केलं जातंय. मोफत मिळाल्यावर तरी लोक हेल्मेट वापरतील हा या मागचा उद्देश आहे .