Mulshi taluka | मुळशी तालुक्यातल्या कोळवण गावाजवळ एकाच कुटुंबातील 5 जणांचा बुडून मृत्यू
Continues below advertisement
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातल्या कोळवण गावाजवळ आज एक दुर्दैवी घटना घडली. ओढ्याच्या काठावर धुणे धुण्यासाठी गेलेल्या एका महिलेचा तीन मुली आणि पतीसह बुडून मृत्यू झाला आहे. आज सकाळच्या कोळवण जवळील गावात सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यातील पाचही मृतदेह ओढ्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहेत अशी माहिती पौड पोलिसांनी दिली. घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. शंकर दशरथ लायगुडे (वय 38), पौर्णिमा शंकर लायगुडे (वय 36), अर्पिता शंकर लायगुडे (वय 20), राजश्री शंकर लायगुडे (वय 13) आणि अंकिता शंकर लायगुडे (वय 12) अशी मृत्युमुखी पडलेल्या सर्वांची नावे आहेत. हे सर्वजण मुळशी तालुक्यातील वाळीण गावचे रहिवासी होते.
Continues below advertisement