Serum Institute fire | सीरम इन्स्टिट्यूटमधील आगीत पाच जणांचा मृत्यू : महापौर मुरलीधर मोहोळ
सीरम इन्स्टिट्यूटमधील आगीत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. देशभरात कोरोना लस पुरवणाऱ्या पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग लागली आहे. BCG लस बनवण्याच्या इमारतीला आग लागलेली आहे. ज्या ठिकाणी बी सी जी लस बनवली जाते त्या ठिकाणी आग लागली आहे. सीरम इन्स्टिट्यूटचा हा मांजरी भागातील नवीन प्लांट आहे. अग्निशामक दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
Tags :
Mayor Muralidhar Mohol Adar Poonawalla Serum Institute Reaction Adar Poonawalla News Serum Institute Fire In Pune Pune Serum Institute Fire Serum Institute Breaking News Serum Institute Fire News Serum Fire News Serum Institute Fire Fire At Serum Institute Pune News