First Tesla Office in India : टेस्लाचं पहिले भारतातील कार्यालय पुण्याात सुरु होणार, कसं असणार?

अमेरिकेतील प्रसिद्ध इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचं पहिले भारतातील कार्यालय पुण्याात सुरु होणार आहे. टेस्ला कंपनीच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांची आणि केंद्र सरकारमधील अधिकाऱ्यांची चर्चा सुरु असतानाच पुण्यात टेस्लाने जागा घेतली आहे. इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनीने पुण्यातील विमान नगर परिसरात कार्यालयासाठी जागा घेतली आहे. टेस्ला भारतात दरवर्षी 5 लाख इलेक्ट्रिक कार बनवण्याच्या गुंतवणुकीच्या प्रस्तावावर चर्चा करत असल्याचं बोललं जात आहे. त्याशिवाय इतर अनेक बाबींबाबत टेस्ला आणि भारत सरकारमध्ये चर्चा सुरु आहे. या चर्चेला अद्याप अंतिम स्वरुप आलेले नाही. त्यामुळे टेस्ला भारतात येणार का? अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. पण आता टेस्लाने पुण्यातील विमाननगरमध्ये कार्यालयासाठी जागा घेतली आहे. टेस्लाचे भारतातील पहिले कार्यालय पुण्यात उभारण्यात येणार आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola