Fake Notes : बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा परदा फाश; छपाई मशिन जप्त

Continues below advertisement

Fake Notes : बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा परदा फाश; छपाई मशिन जप्त पिंपरी चिंचवड पोलिसांनी पाचशे रुपयांच्या बनावट नोटांची छपाई करणारी आणि त्या नोटा बाजारात विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय. धक्कादायक म्हणजे या टोळीकडून प्रिंटिंग मशीन ही ताब्यात घेण्यात आलंय. याच मशीनवर छपाई सुरू असताना देहूरोड पोलिसांनी सहा आरोपींना रंगेहाथ अटक केलीये. त्यांच्याकडून 440 विक्रीसाठी तयार असणाऱ्या हुबेहूब, 4784 प्रिंट झालेल्या आणि एक हजार करन्सी पेपर ही जप्त केलेत. अलीबाबा या वेबसाईटच्या आधारे थेट चायना वरून या पेपरची खरेदी करण्यात आल्याचं तपासात समोर आलंय. आप्पासाहेब बळवंत चौकातून ही प्रिंटिंग मशीन खरेदी करण्यात आली होती. या मशीन बनावट नोटांची छपाई कशी सुरू होती, याचा आढावा घेतलाय नाजिम मुल्ला यांनी.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram