राजकारणीच बेशिस्त, मग जनतेत कुठून येणार शिस्त? राजकारण्यांना सूट, सामान्य जनतेसाठी निर्बंध का?
पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या (Sharad Pawar) उपस्थितीत पार पडणाऱ्या या कार्यक्रमात आणि मेळाव्यात मोठी गर्दी उसळली. यावेळी कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील स्वतः मंचावर होते. एकीकडे महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवारांसह सर्व मंत्री जनतेला गर्दी करू नका. असं आवाहन करतायेत. असं असताना शरद पवारांच्या उपस्थितीत आणि गृहमंत्री वळसे पाटील यांच्या समोर पार पडणाऱ्या कार्यक्रमात सर्व नियम आणि आवाहन धाब्यावर बसवले गेल्याचं चित्र पाहायला मिळालं. सहकार महर्षी माजी आमदार स्वर्गीय शिवाजीराव महादेव तथा दादासाहेब काळे पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आणि शेतकरी मेळावा जुन्नरमध्ये पार पडला.
Tags :
Corona CM Uddhav Thackeray Ajit Pawar Sharad Pawar Uddhav Thackeray Home Minister Corona Rules