DSK DS Kulkarni Bail : डी एस कुलकर्णींची जामिनावर सुटका, पाच वर्षानंतर जामिनावर बाहेर : ABP Majha
नऊ हजार गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप असलेले पुण्यातील बांधकाम व्यावसायीक डी एस कुलकर्णी... पाच वर्षांनंतर जामीन मिळवून ते तुरुंगातून बाहेर आलेत. याचवेळी डी एस कुलकर्णींच्या मालमत्ता विकत घेण्याचे प्रयत्न अनेक बांधकाम व्यावसायिकांनी सुरु केलेत. मात्र त्यातुन मिळणाऱ्या पैशातून सामान्य गुंतवणूकदारांची देणी भागवण्या ऐवजी कवडीमोल दराने डी एस केंच्या मालमत्ता घशात घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप गुंतवणूकदारांकडून होतोय.