DRDO officers arrested by ATS : डॉ. कुरुलकरांची ATS कोठडी संपणार, पाकिस्तानला माहिती पुरवल्याचा आरोप
पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून एटीएसच्या अटकेत असलेले डीआरडीओचे संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांची एटीएस कोठडी आज संपतेय..कुरुलकर यांना एटीएसच्या पथकाकडून न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. कुरुलकर यांची चौकशी तसंच त्यांच्याकडून आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासात मिळालेली माहिती एटीएसकडून न्यायालयात सादर केली जाणार आहे. सुरक्षेचा भाग म्हणून कुरुलकर यांची गोपनीय ठिकाणी चौकशी सुरू आहे.