Pune Metro : 4 विस्तारीत मार्गांचा डीपीआर राज्य सरकारकडे, त्वरित मान्यता मिळण्याची शक्यता
Pune Metro : 4 विस्तारीत मार्गांचा डीपीआर राज्य सरकारकडे, त्वरित मान्यता मिळण्याची शक्यता
पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील चार विस्तारित मेट्रो मार्गिकांचा सविस्तर प्रकल्प मंजुरीसाठी महापालिकेने राज्य शासनाकडे पाठविला आहे. त्यामुळे मेट्रो मार्गिकेच्या विस्ताराच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडले असून, राज्य शासनाच्या मान्यतेनंतर केंद्र सरकारकडे हा प्रस्ताव पाठविण्यात येईल. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लक्षात घेता राज्य आणि केंद्र शासनाकडून या प्रस्तावाला तातडीने मान्यता मिळण्याची शक्यता आहे.