coronavirus | कोरोनाग्रस्तांची नावं सोशल मीडियावर उघड करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार
कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची नावे सामाजिक माध्यमातून (सोशल मिडिया) उघड करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल,असा इशारा विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिला आहे. अशा परिस्थितीत सर्वांनी दक्षता घेणे आवश्यक आहे.