Ganeshotsav 2020 | पुण्यात फिरत्या विसर्जन हौदावरुन वाद, कचरागाड्या वापरल्याचा मनसेसह ब्राम्हण महासंघाचा आरोप
पुणे : पुण्यात घरगुती गणपती विसर्जन करण्यावरुन आता नवीन वाद सुरु झालाय. महापालिकेने गणपती विसर्जनासाठी जे फिरते हौद केले आहेत, ते हौद म्हणजे कचराकुंड्या असल्याचा आरोप मनसे आणि ब्राम्हण महासंघाने केला आहे. मात्र, महापालिकेने हे सर्व आरोप फेटाळले आहेत.
यंदा कोरोनाचं संकट असल्यामुळे प्रशासनाने घरगुती गणपतीचं विसर्जन घरीच करावं, असं आवाहन पुणेकरांना केलं. त्यानंतर महापालिकेकडून 15 क्षेत्रीय भागात 30 फिरते हौद ठेवले आहेत. काल दीड दिवसांच्या गणपतीच विसर्जन बहुतेक जणांनी याच हौदात केलं. मात्र, महाराष्ट्र निर्माण सेना, ब्राम्हण महासंघ यांनी फिरते हौद हे कचराकुंड्याच्या गाडीत करत असल्याचा आरोप करत आंदोलनाचा इशारा दिलाय. काल विसर्जन सुरु असताना हौदामधील विसर्जन मनसेने बंद पाडलं. तसेच हे हौदामधील विसर्जन थांबवले नाही तर हौद पाडून टाकू, अस म्हटलंय.

Tags :
Bappa Majha 2020 Lord Ganesha Ganesh Utsav 2020 Ganesh Utsav Bappa Majha Ganpati Visarjan Ganesha Ganpati Bappa Ganeshotsav 2020 Pune