Dilip Walse Patil vs Sharad Pawar : आधी घणाघात, आता सारवासारव; दिलीप वळसे-पाटील नेमकं काय म्हणाले..?
Continues below advertisement
अजित पवार गटाचे नेते आणि शरद पवारांचे अनेक वर्षं सहकारी राहिलेले दिलीप वळसे पाटील यांनी पवारांवर घणाघाती टीका केलीये. जनतेन एकदाही बहुमत देऊन पवारांना मुख्यमंत्री केलं नाही असं वळसे पाटील रविवारी एका कार्यक्रमात म्हणाले. याविरोधात आज शरद पवार गटाने आंदोलन करत वळसे-पाटलांविरोधात निषेध व्यक्त केला.. यावरून बरीच टीका झाल्यावर वळसे पाटील यांनी सारवासारव केलीये. मी पवारांवर टीका करण्याच्या हेतूनं नव्हे, तर खंत व्यक्त करण्यासाठी बोललो असं वळसे पाटील म्हणाले.
Continues below advertisement