Devendra Fadnavis On Girish Bapat Passed Away :भाजपच्या वाटचालीमध्ये गिरीश बापटांचा मोठा वाटा:फडणवीस

Continues below advertisement

Girish Bapat Passed Away : भाजप (BJP) खासदार गिरीश बापट (Girish bapat) यांचं दीर्घ आजाराने निधन  झालं आहे. मागील काही दिवस त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अंत्यविधी संध्याकाळी 7  वाजता वैकुंठ स्मशान भूमीत होणार आहे. 1973 पासून ते राजकारणात सक्रिय होते. पुण्यात भाजपची यशस्वी वाटचाल करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे. पुण्याची ताकद गिरीश बापट अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने भाजपमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.  पुण्यातील कसबा मतदार संघात आणि इतर पुण्यात भाजप पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत केली होती.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram