Tukaram Beej : तुकाराम बीजसाठी वारकऱ्यांची गर्दी, सर्वांचं लक्ष नांदुरी वृक्षाकडे : ABP Majha
Continues below advertisement
जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचं आजच्याच दिवशी सदेह वैकुंठ गमन झालं होतं... त्यामुळे हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो... या निमित्ताने देहू नगरीत वारकरी आणि भाविकांनी तुकोबारायांच्या पादुकांच्या दर्शनासाठी गर्दी करायला सुरुवात केलीय... आज ३७५वी तुकाराम बीज आहे... तुकोबारायांनी ज्या स्थळावरून वैकुठगमन केलं त्या स्थळावर नांदुरकी नावाचं वृक्ष आहे... तुकाराम बिजेला दुपारी बारा वाजून दोन मिनिटांनी नांदुरकी वृक्ष प्रत्यक्ष हलतो, याची अनुभूती वारकरी आणि भाविकांना येते, असं सांगितलं जातं... त्यामुळे या वृक्षाकडे सर्वांचं लक्ष लागलंय...
Continues below advertisement