Darshana Pawar News : दर्शनासोबत काय घडलं? राजगडाच्या पायथ्याशी नेमकं काय घडलं? Ground Report

Continues below advertisement

दर्शना पवारची हत्याच झाल्याचं पोस्टमॉर्टेमच्या अहवालातून स्पष्ट झालंय. दोन दिवसांपूर्वी  राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी दर्शना पवारचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला होता. तिच्या डोक्यावर आणि संपूर्ण शरीरावर मारहाणीच्या जखमा आढळल्या आहेत. पुणे ग्रामीण पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून तपासासाठी पाच पथकं तयार केली आहेत. ९ जून रोजी ती पुण्यात तिच्या सत्काराच्या कार्यक्रमासाठी आली होती. त्यानंतर १० जून रोजी तिचा तिच्या पालकांशी शेवटचा संवाद झाला. दर्शना तिच्या मित्रासह १२ जून रोजी राजगड किल्ल्याच्या परिसरात फिरण्यासाठी गेली होती. त्यानंतर थेट राजगडाच्या पायथ्याची तिचा मृतदेह आढळला होता. त्यानंतर तिचा मित्रदेखील गायब आहे. एमपीएससी स्पर्धा परीक्षेत ती राज्यातून तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन तिची फॉरेस्ट ऑफिसरपदी नियुक्ती झाली होती. दरम्यान, पुणे ग्रामीण पोलिसांची ५ पथके अधिक तपासासाठी रवाना झालीत.  दर्शना पवारचा मृतदेह ज्याठिकाणी आढळला तेथील आढावा घेतलाय नाजीम मुल्ला यांनी

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram