Curfew in Pune | पुणे जिल्ह्यात आजपासून लॉकडाऊन कडक
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आज मध्यरात्रीपासून संपूर्ण पुणे शहर पूर्णपणे बंद राहणार आहे. पुढील सात दिवसात शहरात कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने फक्त सकाळी 10 ते 12 उघडी राहणार आहेत. पुण्यात कर्फ्यूची कडक अंमलबजावणी केली जाणार असून जे उल्लंघन करतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनी गरजेशिवाय कुठल्याच कारणासाठी बाहेर पडू नये, असं पोलिसांनी आवाहन केलंय. तर, सोमवारपासून पुणे जिल्ह्यातील लॉकडाऊन आणखी कडक करण्यात येतोय.