पुण्यात रविवारी कोरोनाग्रस्त बरे होण्याचं प्रमाण 93.21%, कोरोना बरे होण्याच्या दर पुण्यात सर्वाधिक
Continues below advertisement
कोरोनाची चाचणी आता आणखी स्वस्त झाली आहे. कोरोना चाचणीत 200 रुपयांची कपात करण्यात आली आहे. कोरोनाच्या चाचणीसाठी आता जास्तीत जास्त अठराशे रुपये मोजावे लागणार आहे. कोरोना चाचणीसाठी खासगी प्रयोगशाळेत स्वॅब दिल्यास 980 रुपये आकारले जाणार आहेत. कोविड केअर सेंटर्स, हॉस्पिटल, क्लिनिक, क्वॉरंटाईन सेंटर्समध्ये स्वॅब दिल्यास 1400 रुपये आकारले जाणार आहेत. तर घरी येऊन स्वॅब घेतल्यास 1800 रुपये आकारले जाणार आहेत. या नव्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.
Continues below advertisement