राज्यपालांची भूमिका घटनेनुसार की घटनाबाह्य? घटनातज्ञ उल्हास बापट यांच्याशी बातचीत
Continues below advertisement
संविधानिक पदावरील व्यक्तीन कोणत्या धर्माचा अजेंडा चालवणं हे घटनेला धरुन नाही असं मत जेष्ठ घटनातज्ञ उल्हास बापट यांनी व्यक्त केलंय. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना घटनेत काय लिहिलंय याची माहिती नसावी त्यामुळे ते असं बोलत असावेत असही उल्हास बापट म्हणालेत. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या आमदारांच्या प्रस्तावित यादीला मंजुरी देणं हे राज्यपालांना बंधनकारक असतं, मात्र ही मंजुरी कधी द्यायची याला वेळेची मर्यादा नसल्याने राज्यपाल त्यामध्ये खोडा घालू शकतात असही उल्हास बापट म्हणाले.
Continues below advertisement