PM Modi's Visit to Pune: कॉंग्रेसकडून 'मोदी गो बॅक'च्या घोषणा ABP Majha

मेट्रोसह वेगवेगळ्या विकासकामांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. मात्र त्यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं पंतप्रधानांच्या दौऱ्याविरोधात आंदोलनं सुरु केली आहेत.. काँग्रेसनं पुण्यातील अलका चौकात तर  राष्ट्रवादीनं पुणे रेल्वे स्थानक परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याखाली आंदोलन सुरु केलं आहे... काँग्रेसकडून गो बॅक मोदीच्या घोषणा दिल्या जाताहेत..  पंतप्रधान नरेंद्र मोदी नियोजीत कार्यक्रमानुसार १० वाजून २५ मिनिटांनी लोहगाव विमानतळावर पोहोचणार आहेत... युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेला प्राधान्य देण्याऐवजी मोदी विकासकामांच्या उद्घाटनाला का प्रधान्य देताहेत असा प्रश्न काँग्रेसनं विचारला आहे... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola