CM Uddhav Thackeray Pune visit | कोरोनाच्या उपयाययोजनांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री पुणे दौऱ्यावर

पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पुण्याचा दौरा करणार आहेत. पुण्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे मुख्यमंत्री दौरा करुन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. मुख्यमंत्री आज दिवसभर पुण्यात असतील.
राज्यावर कोरोनाचं संकट असूनही मुख्यमंत्री मातोश्रीचा उंबरठा ओलांडत नसल्याची टीका विरोधकांकडून वारंवार होत आहे. शिवाय पुण्यावर अन्याय होत असल्याची टीकाही विरोधक करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा हा दौरा महत्त्वाचा समजला जात आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola