Chhagan Bhujbal Sharad Pawar : छगन भुजबळ-शरद पवार यांचा एकाच गाडीतून प्रवास

Continues below advertisement

Chhagan Bhujbal Sharad Pawar : छगन भुजबळ-शरद पवार यांचा एकाच गाडीतून प्रवास

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने पुण्यात आज (दि.3) त्यांच्या पुतळ्याचे अनावर करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) देखील उपस्थित होते. दरम्यान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी (Sharad Pawar) मंत्री छगन भुजबळांना (Chhagan Bhujbal) पत्रिकेवर एक लिखित संदेश दिला, त्यानंतर दोघांमध्ये काही सेकंदाचा संवादही झाला अन् दोघे एकमेकांकडे हसूही लागले. हे सगळं घडलं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण सोहळ्यात पाहायला मिळालं. 

पुण्यातील चाकण बाजार समितीत सावित्रिबाई फुलेंचा पुतळ्याचे अनावरण 

चाकण बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर सावित्रिबाई फुलेंचा पुतळा उभारण्यात आलाय. याच मंचावर शरद पवार आणि छगन भुजबळ हे दोघे 5 वाजून 45 मिनिटांनी पोहचले. पुतळ्याचं अनावरण पवारांच्या हस्ते होतं अन अध्यक्षस्थानी भुजबळ होते, त्यामुळं मंचावर दोघे एकमेकांच्या बाजूला बसले होते. मात्र मंचावर आल्यापासून दोघांनी एकमेकांकडे पाहणं ही टाळलं होतं.

पुण्यातील घडामोडींमुळं राजकीय वर्तुळात चर्चा 

मुळातच पवार हे  पुण्यातील कार्यक्रमाला चार वाजताच पोहचले होते अन् भुजबळ तब्बल दीड तास उशिरा आल्यानं पवारांना दीड तास ताटकळत बसावं लागलं. त्यामुळं वेळेला महत्व देणाऱ्या पवारांना साहजिकच थोडा का होईना राग आला असेल याची कल्पना भुजबळांना होतीच. त्यामुळं मंचावर आल्यापासून भुजबळांनी ही बोलणं टाळलं. मात्र त्याचवेळी पवारांनी पत्रिकेवर दोन ओळी मजकूर लिहिला. मग भुजबळांच्या हातातील पत्रिका काढून घेतली अन स्वतःच्या हातातील पत्रिका त्यांच्या हातात सोपवली. मग पवारांनी भुजबळांना खुणावले अन वीस मिनिटांनी दोघांमध्ये काही सेकंद संवाद झाला. त्यानंतर दोघे एकमेकांकडे पाहून हसले ही. मंचावरील या घडामोडींमुळं राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेल्या आहेत.

छगन भुजबळ म्हणाले, समता परिषदेच्या सभेत आम्ही शरद पवार यांच्याकडे मंडल आयोगाची शिफारस करण्याची मागणी केली होती. त्याची अंमलबजावणी पवार साहेबांनी केली. शरद पवार यांनी मराठवाडा विद्यापीठाचे नाव बदलले.. त्यांना या कार्यक्रमाला बोलवले ते योग्य केले, छगन भुजबळ यांच्याकडून शरद पवार यांचं कौतुक केलंय. 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram