Chess Board | पुण्यातील प्राध्यपकांनी बनवलं नवं बुद्धीबळ, हत्ती, घोड्यांसह, राजा, वजीरही बुद्धीबळातून गायब | पुणे | ABP Majha
Continues below advertisement
पुण्यातील माजी प्राध्यापक बाळकृष्ण तांबे यांनी बुद्धीबळाला नवं रुप दिलं आहे. 64 घरांच्या पटाऐवजी त्यांनी १०० घरं असलेला पट बनवला आहे. प्रचलित असलेल्या 64 घरांच्या पटामध्ये तांबे यांना काही त्रूटी आढळल्या. तसंच हत्ती, घोडा यासारखी साधने आता युद्धात वापरली जात नाहीत. त्यामुळे आताच्या काळांशी सुसंगत अशी रणगाडा, ड्रोन अशी प्यादी त्यांनी यामध्ये आणली आहेत. यांच्या चाली पण त्यांनी ठरवल्या आहेत. जुन्या पटामध्ये 8 प्यादी असतात तर तांबे यांच्या पटीत 10 प्यादी आहेत. नवीन पटात राजाच्या ऐवजी राष्ट्रप्रमुख, वजीराच्याऐवजी लष्करप्रमुख असेही बदल आहेत. तसंच 2 पद्धतीने चेकमेट केलं जाऊ शकतं. असे एकूण 20 बदल तांबे यांनी केलेले आहेत.
Continues below advertisement