Chandrakant Patil on Pune Drugs Case : पब-बारसाठी नियमावली तयार करण्याची गरज : चंद्रकांत पाटील

Continues below advertisement

Chandrakant Patil on Pune Drugs Case : पब-बारसाठी नियमावली तयार करण्याची गरज : चंद्रकांत पाटील

पुणे: पुणे शहरात पब आणि बारमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी पुणेकरांनी एका व्यासपीठावर एकत्र येऊन ठोसपणे काहीतरी केले पाहिजे, अशी गरज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी व्यक्त केली. गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यात पबमध्ये (Pubs in Pune) खुलेआम ड्रग्ज सेवन करणाऱ्या तरुणांचे व्हीडिओ समोर आले होते. यानंतर पुण्यात बोकाळलेल्या पब आणि बार (bars in Pune) संस्कृतीविरोधात टीकेची झोड उठली आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याचे माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील बार आण पब संस्कृतीला आळा घालण्यासाठी ठोस उपाय करण्याची गरज व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, पुणे हे जगातील व्यवसनामुळे पूर्ण वाया गेलेल्या शहरातील एक शहर झालं की काय, अशी प्रतिमा निर्माण करणे आपण बंद केले पाहिजे. प्रशासनाने त्यासाठी तात्पुरती कारवाई न करता सातत्याने कठोर कारवाई करत राहिले पाहिजे. यादृष्टीने दक्षता पथकात सामान्य नागरिकांना सहभागी करुन घेतले पाहिजे. सगळ्या पुण्याने मिळून तीन किंवा सात दिवस दिवस पब आणि बिअर बार बंद करु, असे ठरवले पाहिजे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram