Serum Institute fire | केंद्रीय तपास यंत्रणांकडून सीरममधील आगीची दखल, गृहखात्याला रिपोर्ट पाठवणार
Continues below advertisement
केंद्रीय तपास यंत्रणांनी सीरममधल्या आगीची माहिती घेतली असून तपास यंत्रणा आगीचा अहवाल केंद्रीय गृहखात्याला सादर करणार आहेत. देशभरात कोरोना लस पुरवणाऱ्या पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग लागली आहे. BCG लस बनवण्याच्या इमारतीला आग लागलेली आहे. ज्या ठिकाणी बी सी जी लस बनवली जाते त्या ठिकाणी आग लागली आहे. सीरम इन्स्टिट्यूटचा हा मांजरी भागातील नवीन प्लांट आहे. अग्निशामक दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
Continues below advertisement
Tags :
Adar Poonawalla Serum Institute Reaction Adar Poonawalla News Pune News Serum Institute Fire In Pune Pune Serum Institute Fire Breaking News Serum Institute Fire Serum Institute Fire News Serum Fire News Serum Institute Fire At Serum Institute