Diwali 2021 : वसुबारसनिमित्त पुण्यातील देवाची आळंदी सजली, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराला सजावट
दिवाळी उत्सवातला पहिला दिवस असून आजच्या दिवशी गाय-वासराची पूजा केली जाते. दिवाळी सुरु झालं असं मानून घरासमोर रांगोळी काढण्यास सुरुवात होते. वसुबारसनिमित्त पुण्यातील देवाची आळंदीही सजली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे. गोमातेच्या प्रतिकृती लावून गाभारा सजवण्यात आला आहे.