CBSE Certificate Scam प्रकरणी पुण्यातील 3 शाळांची चौकशी, प्रकणाची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता
CBSE Certificate Scam प्रकरणी पुण्यातील 3 शाळांची चौकशी, प्रकणाची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता
पुण्यातील तीन शाळांनी सीबीएसईची मान्यता असल्याचं बोगस प्रमाणपत्र उघडकीस आल्यानंतर शिक्षण विभागानं या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. शिक्षण विभागाच्या चौकशीत राज्यभरातील 666 शाळा संशयाच्या भोवऱ्यात आल्याचं राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी म्हटलंय. राज्यातील या 666 शाळांची शिक्षण विभागाकडून चौकशी सुरु करण्यात आली आहे. या शैक्षणिक संस्थांची शाळा चालवण्यासाठीची प्रमाणपत्रं खरी आहेत की बोगस आहेत याची पडताळणी करण्यात येत आहे. पुण्यातील तीन शाळांबरोबरच आणखी सात शाळांची प्रमाणपत्रं बोगस असल्याचा संशय आहेत आणि त्याबद्दलचा चौकशी अहवाल लवकरच सादर करण्यात येणार आहे. विद्यार्थी आणि पालकांची फसवणूक रोखण्यासाठी राज्यातील प्रत्येक शाळेला शिक्षण विभागाच्या मान्यतेचं पत्र शाळेच्या बोर्डावर लावणं शिक्षण विभागाकडून बंधनकारक करण्यात आलं आहे.