Hathras Case | हाथरस बलात्काराच्या निषेधार्थ पुण्यात लाल महाल ते टिळक पुतळा कॅन्डल मार्च
Continues below advertisement
हाथरस घटनेच्या निषेधार्थ पुण्यात आज कँडल मार्च काढण्यात आला. आम्ही पुणेकरांकडून या कँडल मार्चचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भाजप वगळता सर्व पक्षीय कार्यकर्ते सहभागी झाले होते. लाल महल ते टिळक पुतळ्यापर्यंत कँडल मार्चचे आयोजन करण्यात आले. हातात तिरंगा आणि मशाल घेत कँडल मार्च काढण्यात आला. यावेळी योगी सरकारचा निषेध व्यक्त करत पीडित तरुणीला न्याय देण्याची मागणी करण्यात आली. या कँडल मार्चमध्ये महिला, तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
Continues below advertisement