MPSC Examउत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मैदानी परीक्षेची प्रतिक्षा, परीक्षा कधी? विद्यार्थ्यांचा सवाल
पोलीस उपनिरीक्षक पदासाठी अडिच वर्षांपूर्वीच लेखी परीक्षा आणि मुलाखती देऊन पात्र झालेले उमेदवार आता मैदानी परीक्षेच्या प्रतिक्षेत आहेत. कधीही मैदानी परीक्षा जाहीर होईल आणि त्यासाठी तयारी करावी म्हणून सर्वजण दररोज घाम गाळून तयारी करत आहेत. मात्र आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं नेमकी परीक्षा कधी होणार, याबाबत स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणीबी पात्र उमेदवारांची आहे.