Pune Protest : राज्यपालांसह विविध नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांच्या निषेधार्थ पुणे बंदची हाक
राज्यपालांसह विविध नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांच्या निषेधार्थ आज पुणे बंदची हाक दिलीये. महाविकास आघाडीसह विविध सामाजिक संघटनांनी या बंदचं आवाहन केलंय. व्यापारी संघटना, आडत व्यापारी यांनीही या बंदला पाठिंबा दिलाय. बंदसाठी उदयनराजे भोसले, छत्रपती संभाजीराजे, सुषमा अंधारे, सुप्रिया सुळे आदी विविध नेत्यांना आमंत्रित करण्यात आलंय. आज सकाळी १० वाजता डेक्कन भागातील छत्रपती संभाजीराजेंच्या पुतळ्याला अभिवादन करुन मोर्चाला सुरुवात होईल. डेक्कन-अलका चौक-लक्ष्मी रोड-बेलबाग चौक-लाल महाल या मार्गाने मोर्चा प्रस्थान करेल. आज दुपारी तीन वाजेपर्यंत पुण्यातली सगळी दुकानं बंद राहणार आहेत.
Tags :
Governor Support Udayanraje Bhosale Protests Chhatrapati Sambhajiraje Controversial Statements Shops Closed Trade Unions Supriya Sule Sushma Andhare MahaVikas Aghadi Governor Pune Bandh Social Organizations