Ambadas Danve : पिंपरीत अंबादास दानवेंना मराठा आंदोलकांनी दाखवले काळे झेंडे Maratha Reservation
सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे.. अनेक ठिकाणी लोकप्रतिनिधींना गावबंदी करण्यात येतेय.. त्यातच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना आज पिंपरीत काळे झेंडे दाखवण्या आले. पिंपरीतील वायसीएम रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी दानवे गेले होते. तेव्हा मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली. पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेतलं.